Vidhan Sabha Election Exit Poll 2024 : महायुती अन् मविआमध्ये काँटे की टक्कर, मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?

Vidhan Sabha Election Exit Poll 2024 : महायुती अन् मविआमध्ये काँटे की टक्कर, मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?

| Updated on: Nov 21, 2024 | 10:53 AM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं मतदान नुकतंच पार पडलं. जवळपास ६६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर टीव्ही ९ रिपोर्टरच्या एक्झिटपोल नुसार, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं मतदान नुकतंच पार पडलं आणि एक्झिटपोल नुसार, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर आहे. टीव्ही ९ मराठी रिपोर्टरच्या एक्झिट पोलनुसार, महायुती १२९ ते १३९ आणि महाविकास आघाडी १३६ ते १४५ जागा तर इतर १३ ते २३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. महायुती १२९ ते १३९ जागांमध्ये भाजप ८१, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला २५ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला २३ जागांचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडी १३६ ते १४५ जागांपैकी, काँग्रेस ५०, ठाकरेंच्या शिवसेनेला ४४ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ४२ आमदार विजयी होऊ शकतात. टीव्ही ९ मराठी रिपोर्टरच्या एक्झिट पोलचं वैशिष्ट्य पाहिलं तर भाजप ८१ जागांसह सर्वांत मोठा पक्ष होताना दिसतोय. याखोलाखाल काँग्रेस ५० जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष तर ठाकरेंची शिवसेना ४४ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ४२ जागांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. यासह शिंदेंची शिवसेना २५ जागांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून १३ ते २३ अपक्ष उमेदवार निवडून येण्याचा अंदाज आहे.

Published on: Nov 21, 2024 10:53 AM