Special Report | ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार!
निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. मात्र ओबीसींच्या अतिरिक्त आरक्षणाचं काय? असा सवाल करत भाजपने आंदोलन केलं. दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. मात्र ओबीसींच्या अतिरिक्त आरक्षणाचं काय? असा सवाल करत भाजपने आंदोलन केलं. दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अध्यादेश काढून ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. इतर राज्यांनी जसे अध्यादेश काढले आहेत तसेच आपणही अध्यादेश काढणार असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे भाजपने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे पण हे सरकारला उशिरा सूचलेलं शहाणपण आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
Published on: Sep 15, 2021 08:44 PM
Latest Videos