सरकारी शाळांचं होणार खासगीकरण? 62 हजार सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक जाणार?

tv9 Special Report | राज्यातल्या हजारो सरकारी शाळांसाठी महाराष्ट्र सरकारनं दत्तक योजना आणली आहे. मात्र या योजनेला विरोधही होताना दिसत आहे. याद्वारे खासगी कंपन्यांना शाळा दत्तक दिल्या जाणार?

सरकारी शाळांचं होणार खासगीकरण?  62 हजार सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक जाणार?
| Updated on: Sep 24, 2023 | 9:03 AM

मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ | राज्यातल्या हजारो सरकारी शाळांसाठी महाराष्ट्र सरकारनं दत्तक योजना आणली आहे. मात्र या योजनेला विरोधही होतोय. याद्वारे खासगी कंपन्यांना शाळा दत्तक दिल्या जाणार आहेत. त्यामोबदल्यात त्या कंपन्या स्वतःचं नावदेखील शाळेला देऊ शकतात. मात्र ही योजना म्हणजे सरकारी शाळांचं खासगीकरणाकडे पाऊल असल्याचा आरोप होतोय. सरकारी नोकऱ्यांमधली अनेक पदं कंत्राटी केल्यानंतर आता सरकारच्या शाळांबाबत घेतलेला निर्णय वादात आलाय. महाराष्ट्र सरकार राज्यातल्या 62 हजार सरकारी शाळा आता खासगी कंपन्यांना दत्तक देणार आहे. सरकारी शाळा, नगरपालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा अशा शाळांचा समावेश असणार आहे. म्हणजे आतापर्यंत शाळांची देखभाल आणि इतर सारे खर्च सरकार करत होतं. मात्र यापुढे ज्या कंपन्या या निर्णयात रस दाखवतील, त्या कंपन्यांवर शाळांची दुरुस्ती, देखभालसह इतर गोष्टी पुरवण्याची जबाबदारी असणार आहे.

त्यामोबदल्यात जर त्या कंपनीला संबंधित सरकारी शाळेला स्वतःचं नाव द्यायचं असेल तर करारानुसार काही वर्षांसाठी खासगी कंपन्या शाळेच्या नावापुढे आपलं नावही लावू शकतात, त्यासाठी एक दरफलकही सरकारनं जारी केलाय. बघा यासंदर्भातील रिपोर्ट

Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.