मुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी

मुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी

| Updated on: Jun 15, 2021 | 7:58 PM

मुंबई लोकल बाबतचा निर्णय दोन दिवसात होणार आहे. मुंबई लोकलबाबत गुरुवारी (17 जून) निर्णय होण्याची शक्यता आहे (Maharashtra Government will take decision about Mumbai Local in next two days).

मुंबई लोकल बाबतचा निर्णय दोन दिवसात होणार आहे. मुंबई लोकलबाबत गुरुवारी (17 जून) निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्य सरकार गुरुवारी लोकल संदर्भात निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एमएमआर परिसरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर निर्णय होईल, असं ककाणी यांनी सांगितलं आहे (Maharashtra Government will take decision about Mumbai Local in next two days).