राज्यपाल नियुक्त १२ आमदार प्रकरणावर आज सुनावणी, काय होणार फैसला?
VIDEO | राज्यपाल नियुक्त १२ आमदार प्रकरणावर आज सुनावणी होणार, सुप्रीम कोर्ट काय देणार निर्णय, राज्याचं लक्ष
मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात होणाऱ्या या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन प्रचंड राजकारण तापलेलं बघायला मिळालं. विधान परिषदेत एकूण सदस्यसंख्या ही 78 इतकी आहे. यापैकी 12 जागा या राज्यपाल नियुक्त असतात. या 12 जागांवर विविध क्षेत्रातील दिग्गजांना राज्यपालांकडून संधी दिली जाते. त्यासाठी राज्य सरकार सदस्यांची नावं सूचवतं आणि त्याबाबतचा प्रस्ताव पाठवतं. पण महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली 12 नावं राज्यपालांनी मंजूर केली नाही. यावरुन अनेकदा वातावरण तापलेलं बघायला मिळालं. आता सत्तांतरानंतर पुन्हा रिक्त पदं भरवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या. या मुद्द्यावरुन हा वाद वाढत गेला आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे. आता या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज फैसला होणार आहे.