‘औरंग्याच्या अवलादींना सोडणार नाही, कुठून पैदा झाल्या शोध घेणार’, गृहमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
VIDEO | औरंगजेबाचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही, उदात्तीकरणा मागे कोण?; गृहमंत्री फडणवीस म्हणाले, 'चौकशी करणार...'
मुंबई : सोशल मीडियावर औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कोल्हापुरात आज हिंदू संघटनांचा मोर्चा काढला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. पोलिसांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन दिलं. यावेळी खरंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला आणि परिस्थितीत चिघळली. या सगळ्या घडामोडींवर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. “अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या याचा शोध आपल्याला लावा लागेल. याच्या पाठीमागे कोण आहे याची माहिती आपल्याला घ्यावी लागेल. जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजेत, याकरता या अवलादी पैदा झाल्या नाहीत ना? हे देखील आपल्याला तपासून पाहावं लागेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर “कोल्हापुरातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, कुणीही कायदा-सुव्यवस्था खराब होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. कायदा कुणीही हातात घेऊ नये”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.