दाऊद, दाऊद, दाऊद, करताय, ‘ती’ नियुक्ती आमची नाहीच! : दिलीप वळसे पाटील
विनाकारण दाऊद दाऊद (dawood) करू नका. त्यांचा जर दाऊदशी संबंध असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची, त्यांना काढून टाकायचं का याची कारवाई करू, अशी ग्वाही दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आणखी एक पेनड्राईव्ह सादर केला. त्या पेनड्राईव्हद्वारे फडणवीस यांनी मुदस्सीर लांबे यांच्यानिमित्तानं महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी फडणवीस यांच्या या आरोपातील हवाच काढून टाकली. मुदस्सीर लांबे यांच्याबाबतची तुमच्याकडे असलेली माहिती चुकीची आहे. या व्यक्तिची नेमणूक सरकारने केली नाही. या बाबतची निवडणूक 30 ऑगस्ट 2019 रोजी पार पडली होती. ते निवडून आलेले सदस्य आहेत. विनाकारण दाऊद दाऊद (dawood) करू नका. त्यांचा जर दाऊदशी संबंध असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची, त्यांना काढून टाकायचं का याची कारवाई करू, अशी ग्वाही दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली.
Latest Videos