पोलीस दलात मेगाभरती, 50 हजार पदं भरणार, दिलीप वळसे पाटील यांची माहिती
दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची (Police Recruitment) प्रक्रिया सुरु करणार असल्याचं सांगितलं.
महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाचं (Maharashtra Assembly Winter Session) काल सूप वाजलं. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गृह विभाग आणि पोलीस दल यांसदर्भातील चर्चेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची (Police Recruitment) प्रक्रिया सुरु करणार असल्याचं सांगितलं.
Latest Videos