महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात, कुठं आणि कधी घडली घटना?
VIDEO | महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात, ही घटना नेमकी कशी घडली?
रायगड : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला मांडवा येथे अपघात झाला. मांडव्यात उदय सामंत यांची बोट जेट्टीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बोटीवरील सर्वजण सध्या सुखरुप आहेत. बोटीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योगमंत्री उदय सामंत हे आज अलिबागच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी ही घटना घडली. या कार्यक्रमासाठी उदय सामंत हे बोटीतून अलिबागला जात होते. तिथे जात असताना बोटच्या पार्किंग दरम्यान पहिल्या पिलर नंतर दुसऱ्या पिलरला सामंतांची बोट धडकली. त्याच बोटीमध्ये उदय सामंत, त्यांचे सहकारी आणि माजी खासदार आणि छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती हे देखील होते. पण संपूर्ण स्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यात आली. कुठेही कुणालाही दुखापत झालेली नसून उदय सामंत हे सुखरुप आहेत.