मोठी बातमी ! कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं कारण काय?

मोठी बातमी ! कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं कारण काय?

| Updated on: Mar 03, 2024 | 2:52 PM

नीतीश कुमार यांच्या आघाडीतून बाहेर पडण्यानं इंडिया आघाडीच नाहीतर जेडीयूचे नेतेही नाराज आहेत. अशातच महाराष्ट्र जेडीयूचे नेते आणि आमदार कपिल पाटील यांनी पक्षाला रामराम करणार असून आजच नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली आहे.

मुंबई, ३ मार्च २०२४ : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जेडीयू नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे इंडिया आघाडीतून बाहेर पडलेत आणि नीतीश कुमार हे एनडीएसोबत गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नीतीश कुमार यांच्या आघाडीतून बाहेर पडण्यानं इंडिया आघाडीच नाहीतर जेडीयूचे नेतेही नाराज आहेत. अशातच महाराष्ट्र जेडीयूचे नेते आणि आमदार कपिल पाटील यांनी पक्षाला रामराम करणार असून आजच नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली आहे. नीतीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयावर कपिल पाटील नाराज असून त्यांनी जेडीयूला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच आजच नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार कपिल पाटील हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल यूनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आहेत.

Published on: Mar 03, 2024 02:52 PM