रायगडच्या तळीयेमध्ये दरड कोसळली, 38 जणांचा मृ्त्यू, 80 ते 85 जण अडकल्याची भीती

रायगडच्या तळीयेमध्ये दरड कोसळली, 38 जणांचा मृ्त्यू, 80 ते 85 जण अडकल्याची भीती

| Updated on: Jul 23, 2021 | 3:43 PM

दरड कोसळून (Raigad Landslide) झालेल्या मृतांचा आकडा 38 वर पोहोचल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात (Taliye Village) ही भीषण दुर्घटना घडली. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

रायगड : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून (Raigad Landslide) झालेल्या मृतांचा आकडा 38 वर पोहोचल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात (Taliye Village) ही भीषण दुर्घटना घडली. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.

दरम्यान, इतके तास होऊनही राज्य सरकारला या दुर्घटनेचा थांगपत्ताही नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे भाजपच्या काही आमदारांसह तळीये गावात दाखल झाले आहेत. विरोधी पक्षनेता धडपडत गावात येतो, सरकार कुठंय? इथे तलाठीही नाही, असा सतांप तळीये गावातून प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला. प्रवीण दरेकर, भाजप आमदार गिरीश महाजन हे या गावात आहेत.

Published on: Jul 23, 2021 03:43 PM