'कितीही इमानदारीची भाषा करू दे, आमच्याकडेही पुरावे आहेत', अजित पवार यांच्यावर कुणाचा निशाणा?

‘कितीही इमानदारीची भाषा करू दे, आमच्याकडेही पुरावे आहेत’, अजित पवार यांच्यावर कुणाचा निशाणा?

| Updated on: Sep 11, 2023 | 11:44 AM

VIDEO | राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला अप्रत्यक्षपणे हल्लाबोल, अजित दादा यांच्या 'त्या' टीकेवर नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

नागपूर, ११ सप्टेंबर २०२३ | राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘कोणी कितीही इमानदारीची भाषा करू दे. आमच्याकडे देखील पुरावे आहेत. कोण कशासाठी गेलं आहे, पण सत्तेसाठी गेला आहे की सेवेसाठी गेला आहे, विकासासाठी कोण गेलं आहे आणि ईडीच्या दबावात कोण गेलं आहे. सगळे पुरावे आमच्याकडे आहे. योग्य वेळी आवश्यकता असल्यास कोर्टाच्या आदेशापासून सगळं उघड करू. विरोधकांना ज्या धमक्या देतात ते आम्ही सहन करणार नाही’, असे म्हणत वडेट्टीवार यांनी इशाराच दिला आहे. तर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे तुम्ही कितीही तुमचे पाप लपवले तरी तुम्ही कशासाठी सत्तेत गेलात हे लपणार नाही.’ असे म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

Published on: Sep 11, 2023 11:44 AM