कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार? नगरमध्ये लंके की विखे?
आज ११ जागांवर हे चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. महायुतीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, संदीपान भुमरे, रक्षा खडसे, सुजय विखे आणि पकंजा मुंडे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये अमोल कोल्हे, निलेश लंके आणि चंद्रकांत खैरे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
आज १३ मे रोजी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ११ जागांवर हे चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यापैकी अनेक जागांवर दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, संदीपान भुमरे, रक्षा खडसे, सुजय विखे आणि पकंजा मुंडे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये अमोल कोल्हे, निलेश लंके आणि चंद्रकांत खैरे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी, बीड या ठिकाणी मतदान होणार आहे. महायुती आणि भाजपसाठी हा टप्पा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या ११ जागांपैकी फक्त शिरूर मतदारसंघ सोडला तर सर्व ठिकाणी महायुती आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. यंदा मात्र काय होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.