झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; 'त्या' होर्डिंगची ठाण्यात चर्चा

झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ‘त्या’ होर्डिंगची ठाण्यात चर्चा

| Updated on: May 21, 2024 | 1:13 PM

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काही राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचेही पाहायला मिळाले. तर दुसऱ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षांत घेण्याचे प्रकारही सध्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. अशातच ठाण्यात एका बॅनरची चर्चा होतेय

लोकसभेच्या ४८ जागांवर नुकतंच मतदान पार पडलं. राज्यात लोकभेच्या निवडणुकीचं एकूण पाच टप्प्यात मतदान पार पडलं. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काही राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचेही पाहायला मिळाले. तर दुसऱ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षांत घेण्याचे प्रकारही सध्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. अशातच ठाण्यात एका बॅनरची चर्चा जोरदार होताना दिसतेय. यावर देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक… झाले इलेक्शन जपा रिलेशन असं लिहिलं असून त्याखाली हातात हात दिलेलं चित्र देखील दिसतंय. तर निवडणूक संपली आता मैत्रीच्या पक्षात या कारण गेल्या एका महिन्यापासून मित्रांस मित्रांसोबत बंडखोरी झाली होती. आता मित्रांशी आघाडी युती करा, हेच आपले मैत्रीचं राजकारण…. असा आशय या ठाण्यातील बॅनरवर लिहाल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: May 21, 2024 01:13 PM