फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे? भाजप हायकंमाड काय करणार फैसला?
लोकसभेतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. तर त्यानंतर फडणवीस यांनी दिल्लीतील नेतृत्वास भेट दिली. दिल्लीतील भाजपचे हायकंमाडच फडणवीस यांचा फैसला करणार आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीत भेट घेतली. या भेटीतही फडणवीस हे आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. मात्र जर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर राज्याचे गृहमंत्री कोण होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. लोकसभेतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. तर त्यानंतर फडणवीस यांनी दिल्लीतील नेतृत्वास भेट दिली. दिल्लीतील भाजपचे हायकंमाडच फडणवीस यांचा फैसला करणार आहे. फडणवीसांनी राजीनामा दिल्यास पुढे काय करायचं..? फडणवीसांना भाजपच्या प्रदेशाध्यपदाची जबाबदारी द्यायची का? फडणवीसांकडील गृहमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं? असे अनेक सवाल आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.