Ministry Bungalow : बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त, त्यांना बंगले अन् आम्हाला…
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? खातेवाटप कधी होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेलं असताना मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप देखील झाले आहे. तर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना बंगले वाटप करण्यात आले.
महायुती सरकारच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना नुकतेच बंगले वाटप करण्यात आलेत. मात्र बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त केली जात आहे. भाजप मंत्र्यांना बंगले आणि आम्हाला मात्र फ्लॅट असे म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? खातेवाटप कधी होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेलं असताना मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप देखील झाले आहे. तर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना बंगले वाटप करण्यात आले. मात्र या बंगले वाटपावरून महायुतीतील मंत्र्यांमध्ये धुसफूस असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेतून नुकतेच मंत्री झालेल्या संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांना बंगला न देता फ्लॅट देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजी असल्याची चर्चा आहे. महायुती सरकारच्या मंत्र्यांना खातेवाटप केल्यानंतर आता बंगल्यांचं देखील वाटप करण्यात आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांना रामटेक हा बंगला देण्यात आलेला आहे. तर पंकजा मुंडे यांना पर्णकुटी हा बंगला देण्यात आला आहे. नवीन सरकारमध्ये चंद्रशेखर बाबनकुळे यांच्याकडे महसूल खाते याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन हा बंगला देण्यात आलेला आहे. शंभूराज देसाई यांना मेघदूत तर गणेश नाईक यांना पावनगड हा बंगला देण्यात आला असून हसन मुश्रीफ यांना विशाळगड, चंद्रकांत पाटील यांना ब एक सिंहगड, गिरीश महाजन यांना सेवा सदन, गुलाबराव पाटील यांना जेतवन हा बंगला देण्यात आला आहे.