Ajit Pawar NCP : अजित दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
महायुती सरकारचं नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झालं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासन राज्याचं खातेवाटप रखडलं आहे. दरम्यान, फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातं वाटप येत्या दोन दिवसात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला महायुती सरकारमधील जुनीचं खाती जाण्याची शक्यता असल्याची शक्यता आहे. अर्थखातं, महिला आणि बाल कल्याण खात्यासह कृषी खातं […]
महायुती सरकारचं नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झालं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासन राज्याचं खातेवाटप रखडलं आहे. दरम्यान, फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातं वाटप येत्या दोन दिवसात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला महायुती सरकारमधील जुनीचं खाती जाण्याची शक्यता असल्याची शक्यता आहे. अर्थखातं, महिला आणि बाल कल्याण खात्यासह कृषी खातं देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे जुनीच खाती येणार आहेत. जुन्या खात्यांनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अर्थ आणि नियोजन, महिला आणि बालकल्याण, कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि बंदरे, मदत पुनर्वसन, अन्न नगरी पुरवठा आणि अन्न औषध प्रशासन ही खाती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या खात्यांपैकी राज्य उत्पादन शुल्क हे खाते नव्याने राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जुनीच खाती दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं असणार आहे.