Gulabrao Patil | एका कार्यक्रमात चक्क गुलाबराव पाटील यांनी कव्वाली गाऊन सर्वांना केले मंत्रमुग्ध
सध्या जिकडे तिकडे दिवाळी पहाट कार्यक्रमांची मेजवानी सुरु आहे. रसिक प्रेक्षक जादुई स्वरात न्हाऊन निघतायत. जळगावातल्या एका कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ‘चढता सुरज धीरे धीरे’ ही अजरामर कव्वाली गायली. आपल्या भाषणाला आक्रमकपणाची जोड देऊन विरोधकांना अंगावर घेणारे हे तेच गुलाबराव पाटील आहेत का? असा प्रश्न पडवा इतकी छान कव्वाली गुलाबराव पाटील यांनी गायली.
शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांना आपण सभा गाजवणारे नेते म्हणून ओळखतो. त्यांनी मंचावर उभं राहावं आणि हजारो-लाखोंची सभा गाजवावी, हे गेली कित्येक वर्षांचं समीकरण. आक्रमकपणा ही त्यांची ओळख… पण हेच गुलाबराव पाटील जेव्हा रंगात येतात, तेव्हा त्यांच्या तोंडून कव्वाली निघते… चढता सुरज धीरे धीरे ही अजीज नाझा यांची अजरामर कव्वाली गुलाबराव पाटील यांनी गायली.

Latest Videos