Vishwajeet Kadam | संजय राऊतांच्या अंगात आलं नसतं तर विरोधी पक्षात बसलो असतो : मंत्री विश्वजीत कदम

Vishwajeet Kadam | संजय राऊतांच्या अंगात आलं नसतं तर विरोधी पक्षात बसलो असतो : मंत्री विश्वजीत कदम

| Updated on: Sep 19, 2021 | 10:40 AM

संजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले, असं वक्तव्य करत महाविकास आघाडी सरकार स्थापनेचं संपूर्ण श्रेय काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांना दिलं.

संजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले, असं वक्तव्य करत महाविकास आघाडी सरकार स्थापनेचं संपूर्ण श्रेय काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांना दिलं. ठाकरे सरकारचे शिल्पकार शरद पवार यांना मानलं जातं. पण मंत्री विश्वजीत कदम यांनी मात्र संजय राऊत यांना सरकारच्या निर्मितीचं श्रेय दिलं.

मंत्री विश्वजीत कदम सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी सरकार निर्मितीच्या प्रक्रियेवर बोलताना त्यांनी शाब्दिक फटकेबाजी केली. संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून बरं झालं. त्यांच्या अंगात आल्यानेच महाराष्ट्राच्या इतिहासात जे झालं नाही ते घडलं, असं विश्वजीत कदम म्हणाले.