Monsoon Update | विदर्भात कधी दाखल होणार मान्सून? हवामान खात्यानं शेतकऱ्यांना दिला मोलाचा सल्ला
VIDEO | राज्यात मान्सून कधी दाखल होणार? शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करावी का? हवामान खात्यानं काय दिली माहिती?
नागपूर : उन्हाचा पारा चांगलाच तापत असल्याने घामाच्या धारांनी नागरिक चांगलेच त्रस्त आहेत. त्यामुळे विदर्भासह अन्य राज्यातील जिल्हे देखील मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे राज्यात मान्सून कधी दाखल होणार यासह शेतकऱ्यांनी कधी पेरणी करावी? यावर हवामान खात्यानं मोठी अपडेट दिली आहे. विदर्भात मान्सून 15 जूनच्या नंतरच येणार आहे. नागपूर हवामान विभागाने असा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये अजून मान्सूनची परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे 15 जूनच्या आधी विदर्भात मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे. केरळमध्ये मान्सून आल्यानंतर 15 दिवसांत विदर्भात येत असतो. आता अरबी समुद्रात एक सायक्लोन बनताना दिसतो आहे. त्यात मान्सूनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या विदर्भाच्या तापमानात वाढ होणार आहे. चार ते पाच दिवस तापमान वाढलेलं असेल. सायंकाळच्या वेळेला काही भागात हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात, असेही हवामान खात्यानं म्हटलं आहे.