फडणवीस-ठाकरेंचा पुन्हा एकत्र प्रवास, लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं? बघा VIDEO
विधिमंडळात जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले म्हटल्यावर चर्चा तर झालीच पाहिजे... असंच चित्र काहिसं सोशल मिडीयावर पाहायला मिळालं.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. याच अधिवेशनादरम्यान राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आणणारी अशी एक घटना सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. राजकीय प्रतिस्पर्धी आणि कधी काळी असणारे मित्र असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची आज भेट झाली. विधिमंडळात जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले म्हटल्यावर चर्चा तर झालीच पाहिजे… असंच चित्र काहिसं सोशल मिडीयावर पाहायला मिळालं. आजपासून विधान परिषदेच कामकाज सुरु झालं. त्यासाठी तळ मजल्यावरुन तिसऱ्या मजल्यावर जायचं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. यावेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल? याचीच आता चर्चा सुरू आहे.