अजितदादा, निर्णय घेण्यासाठी तुम्ही आमच्यावर प्रेशर टाकताय खरं, पण…; शिवसेनेच्या नेत्याचं वक्तव्य
Sanjay Gaikwad On Ajit Pawar : जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. पाहा ते काय म्हणालेत....
मुंबई : शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. “जुन्या पेन्शन योजनेचा वाद 2005 पासून सुरू आहे. त्याचवेळी अजित पवार यांनी यास विधानसभेत म्हटलं होतं की जुनी पेन्शन योजना ही लागू होणार नाही. जर त्यांच्या काळात त्यांनी ती योजना लागू केली नाही. तर आमच्यावरती प्रेशर कशाला टाकत आहात? असं संजय गायकवाड म्हणालेत. हा मुद्दा बसून मार्गी लागावा यासाठी आम्ही सुद्धा आग्रही आहोत. पण जर संपकरी आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर त्याचा लोकांच्या सेवेवर परिणाम होईल, असंही ते म्हणालेत.
Published on: Mar 15, 2023 03:27 PM