Yavatmal | यवतमाळमध्ये चालकाचं अतिधाडस महागात, पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेली
बसमध्ये 15 जण प्रवास करत होते. वाहून गेलेल्या चौघा जणांपैकी दोघे सुखरुप आहेत, तर चालक-वाहक असे दोघे जण बेपत्ता आहेत. नांदेड -नागपूर मार्गावरील बसला झालेल्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दहागाव येथे पुलावरुन एसटी बस पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुलावरुन पाणी वाहत असतानाही चालकाने रस्त्याचा अंदाज न घेत दाखवलेले धाडस महागात पडले आहे. गावकऱ्यांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बसमध्ये 15 जण प्रवास करत होते. वाहून गेलेल्या चौघा जणांपैकी दोघे सुखरुप आहेत, तर चालक-वाहक असे दोघे जण बेपत्ता आहेत. नांदेड -नागपूर मार्गावरील बसला झालेल्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
Latest Videos