Raj Thackeray : ‘…तर हात मोकळे सोडून नराधमांना फोडून काढा’, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरेंकडून मनसैनिकांना आदेश
निवडणुकांनंतर मराठी माणसाविरोधात दंडेलशाही सुरू असं राज ठाकरे म्हणतात. महिलांवर अत्याचार वाढतायत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांना संदेश राज ठाकरेंकडून राज्यातल्या समस्यांवर हे भाष्य करण्यात आलेलं आहे.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांना संदेश राज ठाकरेंकडून राज्यातल्या समस्यांवर भाष्य करण्यात आलेलं आहे. नवीन वर्षानिमित्त राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकांनंतर मराठी माणसाविरोधात दंडेलशाही सुरू झाल्या. मराठी माणूस फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालंय. राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक पण त्यांच्यात संघर्ष पेटलाय. महागाईने लोक होरपळली आहेत राज्यात महिलांवर अत्याचार होताहेत. महिलांबाबतच्या तक्रारींसाठी पक्षाच्या कार्यालयात कक्ष सुरू करा. महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर पाठपुरावा करा. तरीही काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून नराधमांना चांगलं फोडून काढा. महागाईने हरपलेल्या जनतेला दिलासा द्यायला हवा आहे. यासाठी साठेबाजी होत नाहीये ना हे पाहून त्याची सूचना संबंधित खात्यांना करा. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनवण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आपल्याला शाखा कार्यालये पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा. सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार प्रसारासाठी वापरायचा आहे. पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना त्याच्या अधीन जात नाही ना ते पाहा. निवडणूक निकाला नंतर मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं आहे. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरू आहे. लवकरच मी सविस्तर बोलेन अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच राज ठाकरे यांनी हा संदेश कार्यकर्त्यांना दिलाय.