मुख्यमंत्री खुर्चीवरच मनसेचा दावा; भावी मुख्यमंत्री, बॅनरबाजी
दादरमधील शिवसेना भवनासमोर मनसेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी एक बॅनर्स लावले आहे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे कोणावर बोलणार? काय टीका करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. याचदरम्यान मनसेकडून शिवसेना भवन आणि दादर परिसरात प्रचंड बॅनरबाजी केली आहे. त्यातीलच एक बॅनर सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनला असून राज ठाकरे यांची चर्चा जोरदार सुरू आहे.
दादरमधील शिवसेना भवनासमोर मनसेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी एक बॅनर्स लावले आहे. ज्यात महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री, हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर राजकीय चर्चांना उधान आले आहे.
Published on: Mar 22, 2023 09:37 AM