‘राज्यात आता २ अलिबाबा आणि ८० चोर,’ महायुती सरकारवर कुणी लगावला खोचक टोला?
VIDEO | भाजपवर दुसऱ्यांची घरं आणि पक्ष फोडण्याची वेळ आलीये, राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय विडेट्टीवार यांची भाजपवर सडकून टीका तर तीन रिमोट आणि एक टिव्ही म्हणत राज्य सरकारला लगावला टोला
बुलढाणा, ७ सप्टेंबर २०२३ | सध्या राज्यात अनागोंदी कारभार सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. इतकंच नाही तर आताचं महायुतीचं सरकार हे तीन रिमोट आणि एक टिव्ही असं आहे. तर तीनपैकी कोणीही शासकीय तिजोरी उघडते आणि जमेल तेवढी लुटमार करते, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे. तर सध्या आता २ अलिबाबा आणि ८० चोर आहेत, असे म्हणत राज्यातील तीन पक्षांच्या सरकारवर टीका करताना खोचक टोला लगावला आहे. बुलढाण्यात काँग्रेसच्या लोकसंवाद यात्रेनिमित्त आले असताना विजय वडेट्टीवार यांनी विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर मराठा आंदोलन चिरडण्याचा काम सरकारने केले. फक्त आश्वासने दिले होते, मात्र आता मराठ्यांवर लाठी चालविली. यामध्ये तब्बल १२४ लोक जखमी केले, तुम्ही माफी मागितली म्हणजेच तुम्ही दोषी आहेत, हे आंदोलन चिरडण्याचा काम सरकार पुरस्कृत होते, हे सिद्ध झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी केला.