Maharashtra Politics : फडणवीस आणि राऊत यांच्यात रंगली शेरोशायरी; टीकेला टोल्यानं पलटवार

Maharashtra Politics : फडणवीस आणि राऊत यांच्यात रंगली शेरोशायरी; टीकेला टोल्यानं पलटवार

| Updated on: Jun 20, 2023 | 9:10 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्यावर निशाना साधला होता. तसेच मी पुन्हा येईन असं भर सभागृहात सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी आलोच त्याचबरोबर शिंदे यांना घेऊन. यावेळी त्यांनी 2019 मधला सभागृहातील किस्सा सांगतना 'मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना... मैं समंदर हूं, लौट कर वापस आऊंगा।' यावरून आता जोरदार चर्चा होत आहे.

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळात शाब्दीक टोलेबाजी पहायला मिळत आहे. कल्याणमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्यावर निशाना साधला होता. तसेच मी पुन्हा येईन असं भर सभागृहात सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी आलोच त्याचबरोबर शिंदे यांना घेऊन. यावेळी त्यांनी 2019 मधला सभागृहातील किस्सा सांगतना ‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना… मैं समंदर हूं, लौट कर वापस आऊंगा।’ यावरून आता जोरदार चर्चा होत आहे. तर यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदारल पलटवार करताना शायरीतच उत्तर दिलं आहे. त्यांनी, तूफान में कश्तियां और घमंड में हस्तियां डूब जाती है, अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. राऊत म्हणाले, “फडणवीस यांना कोणीतरी शायरी आणि डायलॉग लिहून देतं आणि ते तेच बोलतात. त्यांची नौका सध्या खूप डगमगत आहे, हे त्यांना लवकरच कळेल. ते शहाणे आणि आम्ही सगळे मूर्ख आहोत काय? अतिशहाणपणाचा अहंकार माणसाला बुडवतो.

Published on: Jun 20, 2023 09:10 AM