फडणवीस यांच्या ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनरवरून ठाकरे गटाची सडकून टीका

| Updated on: Apr 26, 2023 | 8:03 AM

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लागले आहेत. हा भाजपचे पदाधिकारी बबलू गौतम यांनी हा बॅनर लावला आहे. त्यामुळे चर्चांना उत आला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने फडणवीसयांच्यावर निशाना साधला आहे.

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या भावी मुख्यमंत्री या आशेयाच्या बॅनरवरून राजकारण फिरत असल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे त्यांच्या सासूरवाडीतच भावी मुख्यमंत्री म्हणून लागल्याने चर्चांना उधान आले असतानाच याच आशयाचे बॅनर आता नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे लागले आहेत. हा भाजपचे पदाधिकारी बबलू गौतम यांनी हा बॅनर लावला आहे. त्यामुळे चर्चांना उत आला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने फडणवीसयांच्यावर निशाना साधला आहे. विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावरून टीका केली आहे. सध्या एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. भावी एक नाही अनेक असून शकतात. राजकीय घडामोडी या क्षणात बदलत असतात असा टोला लगावला आहे.

Published on: Apr 26, 2023 08:03 AM
सभासदांनी त्यांचे कंडके केले, धनंजय महाडिक यांची सतेज पाटील यांच्यांवर टीका
अमरावतीत 274 जाहिरात होर्डिंग धोकादायक; मनपा अॅक्शन मोडवर, कारवाई होणार?