2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024... या दरम्यान, महाराष्ट्राचं राजकारण कधी नव्हे तर इतकं बदलंय. ज्या पदांमुळे 2019 ला महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी समीकरणं बदलली त्याच बदललेल्या समीकरणांनी त्याच पदांनी त्या परिस्थितीवर आणून ठेवलंय.
2019 ते 2024… या दरम्यान, महाराष्ट्राचं राजकारण कधी नव्हे तर इतकं बदलंय. दोन पक्ष वेगळे झाले, पक्षांचे प्रमुख बदलले मात्र पदांबद्दलचा पेच काही बदललेला नाही. 2019 च्या वेळी मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत वाद रंगला होता. यंदा गृहखात्यावरून तोच वाद रंगत असल्याचे बोलले जात आहे. 2019 च्या निकालानंतर मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सगळ्या घडामोडींना कारणीभूत होती. त्यामुळे मविआचा जन्म झाला. 2022 ला शिवसेना फुटून एकनाथ शिंदे त्या पदावर आलेत नंतर वर्षभराने आपण कधीच मुख्यमंत्री न झाल्याची सल बोलून दाखवत अजित पवारांना शरद पवारांची साथ सोडून महायुतीची वाट धरली. ज्या पदांमुळे 2019 ला महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी समीकरणं बदलली त्याच बदललेल्या समीकरणांनी त्याच पदांनी त्या परिस्थितीवर आणून ठेवलंय. 2019 ला अखंड शिवसेना मुख्यमंत्रिपदाचा वाटा मागत होती. त्यावेळी भाजप मुख्यमंत्रिपद न देण्यावर ठाम राहिलं. तर 2024 ला शिंदेंच्या शिवसेनेकडून गृहमंत्रिपदासह इतर खात्यांवर दावा सांगताय. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप ते देण्यास तयार नाहीये. वर्ष, तारखा आणि पक्ष बदलले असले तरी परिस्थिती मात्र बदललेली नाही.