मुंबईत पावसाचा रेड अलर्ट; ‘मुंबईकरांनो गरज असेल तरच…’, पालिका आयुक्तांचं काय आवाहन?
VIDEO | महाराष्ट्रात पावसाचं थैमान, 'या' जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट, तुमच्या जिल्ह्याचा आहे का समावेश? बघा व्हिडीओ
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यभरातील अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचं सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज गुरूवारी हवामान खात्यानं मुंबईसह पुणे, रायगड आणि रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ठाणे,रत्नागिरी, चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २८ गावांतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईमध्ये हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केल्यानं पावसाचा धोका पाहता महापालिका प्रशासनाने मुंबईकरांना सतर्क राहायला सांगितलंय. तसेच गरज असल्यास आणि महत्वाचं काम असेल, तरच घराबाहेर पडा, असं आवाहन मुंबई महापालिकेने केला आहे. तर दिलासादायक म्हणजे मुंबईला एकूण ७ तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे ७ पैकी २ तलाव हे ओसंडून वाहू लागल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.