Maharashtra Rain : शेतीचं नुकसान, वाहून गेली लोकं; विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, बघा कुठे काय परिस्थिती?

Maharashtra Rain : शेतीचं नुकसान, वाहून गेली लोकं; विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, बघा कुठे काय परिस्थिती?

| Updated on: Sep 03, 2024 | 11:49 AM

मराठवाडा आणि विदर्भात पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. परभणी, बीड आणि नांदेडमध्ये अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गावामध्ये पाणी शिरलं आहे. तसेच सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठं नुकसानं झाले आहे.

वाशिमच्या मंगरूळपूर येथील एका नदीत तरूणाला स्टंटबाजी करणं चांगलंच महागात पडलं आहे. हा तरूण नदीत स्टंटबाजी करत असता वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या या तरूणाचा शोध सुरू आहे. तर नांदेडमधील आसना नदीत एक तरूण वाहून गेल्याची घटना घडली आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना एका व्यक्तीने पुलावरून चालत जाण्याचं धाडस केलं. दरम्यान, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ही व्यक्ती पुराच्या पाण्यासोबत वाहून गेली आहे. तर बीडच्या माजलगाव येथील गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली त्यामुळे गंगामसला येथील श्री मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे बीडच्या अंबाजोगाईमधील रेना नदीला पूर आला आहे त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यासोबत वसमत नांदेडमधील उघडी नदीला पूर आला आहे. यामुळे आजू-बाजूच्या शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट, राज्यात कोणत्या भागात काय परिस्थिती?

Published on: Sep 03, 2024 11:46 AM