Maharashtra Weather : राज्यात पुन्हा धो-धो बरसणार, ‘या’ भागात पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Maharashtra weather forecast Update news : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बघा कुठे कसा कोसळणार पाऊस?

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा धो-धो बरसणार, 'या' भागात पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
| Updated on: Sep 02, 2024 | 11:53 AM

ऑगस्ट महिन्यात काहिशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात दमदार एन्ट्री घेतली आहे. राज्यातील गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपतीसाठी नागरिकांची एकच लगबग सुरू आहे. तयारी करण्यासाठी दिवस कमी असल्याने सगळ्यांचीच धावाधाव पाहायला मिळत असताना पाऊस काही कमी होताना दिसत नाही. अशातच राज्यातील पुढील चार ते पाच दिवस राज्यात पाऊस ठाण मांडून राहणार आहे. अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ होसाळीकर यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे. ‘राज्यात काही ठिकाणी पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर येत्या २४ तासांसाठी मराठवाडा, विदर्भाच्या काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात ही याचा प्रभाव असणार आहे. आजही पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे. तर येत्या ४ सप्टेंबरपासून तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे’, असे होसाळीकर यांनी म्हटले आहे.

Follow us
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.