Maharashtra Weather : आज अन् उद्या धुव्वाधार, राज्यातील 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा; काय सांगतंय हवामान खातं?

Maharashtra Weather : आज अन् उद्या धुव्वाधार, राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; काय सांगतंय हवामान खातं?

| Updated on: Sep 08, 2024 | 11:15 AM

हवामान विभागाच्या माहितीनुसार, हवामानविषयक प्रणालीचा परिणाम म्हणून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यासह विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, सातारा आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यांवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या या इशाऱ्यानुसार, आज आणि उद्या विदर्भात अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात आणखी दोन दिवस पावासाचे असून पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. पुढील दोन दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, वायव्य अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेय, त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

Published on: Sep 08, 2024 11:15 AM