Nashik Expressway | मुसळधार पावसामुळे नाशिक-मुंबई महामार्गाच्या डागडुजीची पोलखोल
VIDEO | नाशिक-मुंबई महामार्गवर खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई : मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई नाशिक महामार्गावरील ठाणे भिवंडी बायपास रस्ता 24 तास वाहतूक कोंडीत अडकलाय अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यावर खारीगाव टोल नाका ते येवई नाका या तब्बल आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. पावसाळ्यात या मुख्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील खड्डे भरलेले असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचा वेग मंदावलेला आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहने एकाच जागेवर दीड ते दोन तास अडकून पडत आहेत. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत सुरू आहे. दरम्यान, मुंबईसह पुणे, रायगड आणि रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.