Mumbai Rain | पुढचे दोन दिवस मुंबईला पावसाचा येलो अलर्ट

| Updated on: Sep 21, 2021 | 8:43 AM

मुंबईसाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट राहणार आहे. तर पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला

पुढचे दोन दिवस मुंबईला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट राहणार आहे. तर पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी नाल्यांना अक्षरशः महापूर आला आहे. तर राष्ट्यावरुनही पुरासारखे पाणी वाहिले. अनेक ठिकाणी गावात आणि घरातही पावसाचे पाणी घुसले. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याला तब्बल दोन तास पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दुसरीकडे, हवामान विभागाच्या अंदाजानुसार काल सायंकाळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसाचा काढणीस आलेल्या उडीद पिकाला फटका बसणार असून ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनचंही या मुसळधार पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. असाच सलग जर पाऊस पडत राहला तर खरीपाच्या पिकांचं अतोनात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.