कर्जत खोपोली दरम्यान पावसाची जोरदार बॅटिंग, पावसानं माती वाहून गेली, रेल्वे ट्रॅक अधांतरी
कर्जत ते खोपोली दरम्यान ट्रँकच्या खालून पाण्याच्या जोरमुळे जमिनीचा मोठा भाग वाहून गेला आहे. रेल्वे ट्रँक अधांतरी राहिला आहे.
कर्जत ते खोपोली दरम्यान ट्रँकच्या खालून पाण्याच्या जोरमुळे जमिनीचा मोठा भाग वाहून गेला आहे. रेल्वे ट्रँक अधांतरी राहिला आहे. सीएसटी ते खोपोली लोकल लाईन कर्जत ते खोपोली दरम्यान केळवली व डोलवली च्या मध्ये 106 ते 108 किमी मध्ये अनेक ठिकाणी ट्रक खालील जमिन वाहून गेली आहे. दोन नाल्याच्या दरम्यान रात्री पाणी जास्त आल्याने दोन्ही नाल्याचे खाबं ही वाहून गेले आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून ट्रॅक पूर्ववत करण्याचं काम सुरु आहे. कर्जत ते खोपोली मार्गावरील रल्वे ट्रँक खालील माती वाहून गेली. केळवली ते डोलवली स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅक खाली जमिनीचा मोठा हिस्सा वाहून गेल्याने रेल्वे ट्रॅक अधांतरी लटकला आहे. त्या कारणाने खोपोली-कर्जत रेल्वे मार्ग तातडीने बदं करण्यात आल्या आहे.
Latest Videos