साताऱ्यातील भांबवली धबधबाचे विहंगम दृश्य तुम्ही पाहिलंत का? बघा व्हिडीओ
VIDEO | भारतातील सर्वात उंच धबधबा अशी ओळख असलेल्या साताऱ्यातील भांबवली धबधबाचे विहंगम दृश्य तुम्ही पाहिलंत का? tv9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास व्हिडीओ
सातारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यभरातील अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. तर सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली असून जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला भारतातील सर्वात उंच भांबवली धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.. या धबधब्याची उंची तब्बल 1840 फूट म्हणजेच 560 मीटर आहे..या धबधब्याचे पाणी हे तीन टप्प्यात जमीनीवर पडत असून हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहतो. सध्या कास तलाव पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे याच्या सांडव्यावरुन पडणारया पाण्यापासुन पुढे 5 किलोमीटर या धबधब्याचे विहंगम दृष्य पहायला मिळते. Tv9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास या धबधब्याचे EXCLUSIVE विहंगम दृष्य. दरम्यान, सातारा जिल्ह्यात आज रेड अलर्ट असल्यामुळे पुढील सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागासाठी एक NDRF चे पथक कराड येथे दाखल झाले असून धोकादायक दरड प्रवण क्षेत्रातील 41 गावातील 500 कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे.