चियर्स… पेगवर पेग रिकामे होणार, ‘या’ तीन दिवशी रात्रभर दारूची दुकाने सुरू राहणार
ख्रिसमसला सुट्टी असल्याने काही शाळा, कॉलेज, ऑफिसेसमध्ये दोन ते तीन दिवस आधीच साजरा होताना दिसतोय. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी असं काहीसं वातावरण राज्यात पाहायला मिळत आहे.
मुंबई, २१ डिसेंबर २०२३ : राज्यभरात इअर एन्डचा उत्साह जोरात सुरू आहे. सलग सुट्टया आल्याने सर्वांनीच लाँग विकेंड पिकनिकचा प्लान केलाय. तर ख्रिसमसला सुट्टी असल्याने काही शाळा, कॉलेज, ऑफिसेसमध्ये दोन ते तीन दिवस आधीच साजरा होताना दिसतोय. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी असं काहीसं वातावरण राज्यात पाहायला मिळत आहे. अशातच ३१ डिसेंबर म्हटलं की पार्ट्या सेलिब्रेशन हे आलंच. त्यामुळे ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला मद्यप्रेमींना खूश ठेवण्यासाठी, तसेच ऐन पार्टीच्या वेळी मद्यप्रेमींची गैरसोय होऊ नये यासाठी मद्यविक्रीच्या दुकानांच्या वेळांना सूट दिली आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास सरकारने परवागी दिली आहे.