Maharashtra SSC Result LIVE | दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 99. 95 टक्के, यंदाही मुलींचीच बाजी
कोरोनाच्या संकटामुळे यंदा दहावीची परीक्षा झालीच नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच गणित बांधण विद्यार्थ्यांसह शैक्षणिक खात्यालाही अवघड होतं. पण अखेर आज दहावीचा निकाल ऑनलाईनरित्या जाहिर करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. परंतु निकाल जाहीर करताना आणि प्रसिद्ध केलेल्या नोटमध्ये देखील एक्झॅट अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आकडा किती, याचा आकडा दिलेला नाही.
यंदाच्या वर्षी राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला असून, कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. यावेळी काही विद्यार्थ्यांचे निकाल राखी तर सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. यामध्ये काही हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
Latest Videos