‘महाराष्ट्र-तेलंगणा एकत्र मिळून काम करणार’ – CM K. Chandrashekar Rao

| Updated on: Feb 20, 2022 | 7:43 PM

केंद्रातल्या भाजप (BJP) सरकारविरोधात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोट बांधण्याचे संकेत नुकतेच ‘केसीआर’ यांनी दिले होते. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचा मनोदयही व्यक्त केला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘केसीआर’ यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

मुंबईः तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) अर्थातच के. चंद्रशेखर राव हे थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यासाठी ते मुंबईत पोहचले असून, त्यांचे सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी स्वागत केले. सध्या ‘केसीआर’ तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. केंद्रातल्या भाजप (BJP) सरकारविरोधात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोट बांधण्याचे संकेत नुकतेच ‘केसीआर’ यांनी दिले होते. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचा मनोदयही व्यक्त केला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘केसीआर’ यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली.