Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 5 PM

| Updated on: Dec 01, 2021 | 6:15 PM

मुख्यमंत्री झाल्यानंतर ममता बॅनर्जी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या आहेत. आज त्यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी मीडियाशी संवाद साधला. ममता बॅनर्जी यांनी काल शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री झाल्यानंतर ममता बॅनर्जी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या आहेत. आज त्यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी मीडियाशी संवाद साधला. ममता बॅनर्जी यांनी काल शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. आज त्या मला भेटायला आल्या, असं पवार म्हणाल्या. विदेशात राहून राजकारण कसं करता येईल? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्याबाबत पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर साधी गोष्ट आहे. फिल्डवर राहून काम केल्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय झाला. पश्चिम बंगालमधील लाखो कार्यकर्ते फिल्डवर होते म्हणून त्यांचा विजय झाला. त्यामुळे त्यांचा वैयक्तिगत अनुभव त्यांनी सांगितला. आम्ही त्याचं स्वागत करतो, असं पवार म्हणाले.