राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून ‘या’ 7 नावांची यादी तयार, आजच होणार शपथविधी
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुतीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्यपाल नियुक्त १२ रिक्त जागांपैकी ७ जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी आजच पार पडणार आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 7 नावं समोर आली आहेत. भाजपकडून भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, भाजप पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड ही नावं समोर आली आहेत. तर यांना भाजपकडून संधी देण्यात आली असून यांचा आजच शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांचं नाव असल्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी या नावांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शिफारस करण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजता राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा शपथविधी पार पडणार असून विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होईल. उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधान परिषद सदस्यांना शपथ देणार आहेत.