Unseasonal Rain : हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला राज्यात अवकाळी पाऊस, ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह तुफान कोसळणार
बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. यामुळे राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे 26 आणि 27 डिसेंबरला राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे
राज्यात गेले काही दिवस कडाक्याची थंडी पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर राज्यातील काही शहरांचे तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. परंतु आता वातावरणात बदल होतान दिसतोय. आता हिवाळ्याच्या थंडीत पाऊस कोसळताना दिसणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील थंडी गायब होत असून पावसाला पोषक वातावरण तयार झालंय. बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. यामुळे राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे 26 आणि 27 डिसेंबरला राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, जालन्यात पावसाची शक्यता आहे. तर बीड परभणी, हिंगोली आणि अकोल्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच अमरावती, बुलढाणा, वाशिममध्येही पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढणार असून २६ ते २८ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतर वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार ३० डिसेंबरपासून राज्यात थंडी वाढणार आहे.