राज्यातील पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना !

राज्यातील पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना !

| Updated on: Apr 19, 2022 | 3:26 PM

गृहविभागाकडून राज्यातील पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात अशांतता पसरविण्याचा काही घटकांचा प्रयत्न आहे. राजकीय नेता, संघटनेनं तणाव निर्माण केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय.

मुंबई : गृहविभागाकडून राज्यातील पोलिसांना (Police) अलर्ट (Alert) राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात अशांतता पसरविण्याचा काही घटकांचा प्रयत्न आहे. राजकीय नेता (Political Leader) , संघटनेनं तणाव निर्माण केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय.
याविषयी बोलताना गृहमंत्री म्हणालेत, राज्यामध्ये काही घटकांकडून अशांतता पसरविण्याचा प्रयत्न केला जातोय, त्या संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. कुठेही समाजात तणाव निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय. समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य जर कुणाकडून घडलं तर कठोर कारवाई करण्यात येईल.