महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?
VIDEO | महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे सांताक्रुझ पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर तुषार गांधी यांना संताप
मुंबई, ९ ऑगस्ट २०२३ | महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना सांताक्रुझ पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील गिरगांवमध्ये अविस्मरणीय बलिदान भारत छोडो आंदोलनात जात असताना महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भारत छोडो आंदोलनाच्या निमित्ताने हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या तुषार गांधींवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर तुषार गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र पोलिसांनी या कारवाईवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर यावरून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी जगताप यांनी, भारत छोडो मोहीम इथून सुरुवात झाली होती. आज असं वाटतं आहे की पुन्हा 1942 आलं आहे की काय? कारण ज्या इंग्रजांना भारतीयांना आवाज दाबता आला नाही. तो प्रयत्न हे सरकार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.