'संभाजी भिडे यांची हिंमत नाही, त्यांचा बोलविता धनी...', महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचा आरोप कुणावर?

‘संभाजी भिडे यांची हिंमत नाही, त्यांचा बोलविता धनी…’, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचा आरोप कुणावर?

| Updated on: Aug 10, 2023 | 4:31 PM

VIDEO | संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ; महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल... तुषार गांधी, विश्वंभर चौधरी, कुमार सप्तर्षी, मेधा पुरव सामंत, अन्वर राजन, संकेत मुनोत, युवराज शहा यांनी संभाजी भिडे आणि त्यांचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यावर तक्रार दाखल

पुणे, १० ऑगस्ट २०२३ | महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात थेट महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी पोलिसात तक्रार केली आहे. यावेळी संभाजी भिडे यांचं विधान आक्षेपार्ह असून त्यांना अटक करण्यात यावी. त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी तुषार गांधी यांनी केली आहे. तुषार गांधी, विश्वंभर चौधरी, कुमार सप्तर्षी, मेधा पुरव सामंत, अन्वर राजन, संकेत मुनोत, युवराज शहा यांनी संभाजी भिडे आणि त्यांचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यावर तक्रार दाखल केली आहे. संभाजी भिडे आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. तर यावेळी तुषार गांधी यांनी आरएसएसवर थेट आरोप केल्याचे पाहायला मिळाले. अशा प्रकारची विधाने करण्याची संभाजी भिडे यांची हिंमत नाही. त्यांचा बोलविता धनी आरएसएस आहे. देवेंद्र फडणवीस हे सभागृहात एक आणि बाहेर वेगळं बोलत असतात. संभाजी भिंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आम्ही तक्रारीत केली असल्याची माहिती तुषार गांधी यांनी दिली.

Published on: Aug 10, 2023 04:29 PM