Chandrakant Patil | सरकारला पोटापेक्षा नशेची पडलेली : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | सरकारला पोटापेक्षा नशेची पडलेली : चंद्रकांत पाटील

| Updated on: Jan 09, 2022 | 4:15 PM

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना सरकार जर मिनी लॉकडाऊन सारखा निर्णय घेत असेल तर ते चालनार नाही. प्रत्येक नागरिकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यांना तुम्ही काळजी घेण्यास सांगू शकता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना सरकार जर मिनी लॉकडाऊन सारखा निर्णय घेत असेल तर ते चालनार नाही. प्रत्येक नागरिकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यांना तुम्ही काळजी घेण्यास सांगू शकता. राज्यात मनमानी कारभार सुरु आहे.कोरोनाबाबतच्या नियमावली बनावट असताना राज्य सरकारने विरोधकांना विचारात घेतले नाही. असा आरोप भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला आहे. कधी शाळा सुरु करता, कधी बंद करता, कधी व्हर्च्युअल म्हणता , कधी परीक्षा व्हॅच्युअल म्हणता हा सगळा सत्यानाश चालला आहे. शंभर लोकांच्या मुलाखती घेतल्यातर तुम्हाला सत्यानाश सुरु आहे हे उत्तर देतील. राज्य सरकारने सर्वांसोबत बसून एकमताने निर्णय घेणे अपेक्षित आहे. राजेश टोपे जालन्यात एक बोलणार , अजित दादा शुक्रवारच्या बैठकीत एक बोलणार , यासगळ्या मध्ये कोरोनाला सिरिअसली घेऊ नका असे नाही, पण दुसऱ्या बाजूला घाबरवू पण नका असे ते म्हणाले आहेत.

Published on: Jan 09, 2022 03:54 PM