Devendra Fadnavis | नुकसानग्रस्त भागात महाविकास आघाडी सरकारचं दुर्लक्ष : देवेंद्र फडणवीस
नुकसानग्रस्त भागांना त्वरीत मदत करण्यात यावी अशी मागणी करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचं नुकसानग्रस्त भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आज पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. नुकसानग्रस्त भागांना त्वरीत मदत करण्यात यावी अशी मागणी करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचं नुकसानग्रस्त भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला.
राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतरही एकाही मंत्र्यांनी शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली नाही. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सीएम सोडाच पालकमंत्र्यांनीही पाहणी दौरा केला नाही. सीएम यांनी तात्काळ दौरा केला पाहिजे. हे सरकार विदर्भ, मराठवाडा विरोधी सरकार आहे, असा आरोप करतानाच पीकविमा सरकारची जबाबदारी आहे. कंपनीवर दबाव वाढवत शेतकऱ्यांना सरकारनेच दिलासा दिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
Latest Videos