MVIA Tea Program | मविआ सरकारचा चहापानाचा कार्यक्रम संपन्न, उद्धव ठाकरे गैरहजर
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्यक्षपणे सहभागी नव्हते.
मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्यक्षपणे सहभागी नव्हते. मात्र, त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या चहापानाच्या कार्यकर्मावर विरोधकांनी मात्र बहिष्कार घातला. तसंच हिवाळी अधिवेशात विविध मुद्द्यांवर सरकारला घेरणार असल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापणार असल्याचं आता स्पष्ट आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यकर्माला काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, दीपक केसरकर, अंबादास दानवे आदी नेत्यांनी उपस्थिती लावली. तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडेंनीही चहापानाला उपस्थिती लावली. दरम्यान, चहापानापूर्वी अतिथीगृहातील समिती कक्षात चहापानापूर्वी विधिमंडळ सदस्य शेकापचे जयंत पाटील, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रारंभी स्वागत केले.