वंचित मविआत राहणार की नाही?; मविआकडून काय दिली नवी ऑफर?
महाविकास आघाडीकडून ठाकरे गट आणि शरद पवार गटाची यादी लवकर जाहीर होणार आहे. यापूर्वीच प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला महाविकास आघाडीकडून ५ जागांची नवी ऑफर देण्यात आली आहे. मात्र वंचितकडून ६ जागांची मागणी करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीने वंचितला नवी ऑफर दिलीये. पाच जागांची ऑफर वंचितला देण्यात आल्याची माहिती आहे. तर लवकरच वंचित आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. महाविकास आघाडीकडून ठाकरे गट आणि शरद पवार गटाची यादी लवकर जाहीर होणार आहे. यापूर्वीच प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला महाविकास आघाडीकडून ५ जागांची नवी ऑफर देण्यात आली आहे. मात्र वंचितकडून ६ जागांची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटाकडून प्रत्येकी दोन दोन जागा सोडाव्यात अशी वंचितची मागणी आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांनी अजूनही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. इतकंच नाही तर त्यांना दिलेल्या ५ जागांच्या प्रस्तावावर उत्तर येण्याची अपेक्षा आहे. महाविकास आघाडी आणि वंचितच्या गोटातून जे समोर येतंय त्यानुसार, वंचितला महाविकास आघाडीकडून ५ जागांची नवी ऑफर देण्यात आली आहे. मात्र वंचितकडून ६ जागांची मागणी आहे.